esakal | लग्नाचे फोटो न देणे फोटोग्राफरच्या अंगाशी; दंड म्हणून द्यावे लागणार दोन लाख रुपये!
sakal

बोलून बातमी शोधा

Photographer

लग्नाच्या दिवशी काढलेल्या फोटोंची तक्रारदारांनी स्वप्नील यांना भेटून पडताळणी केली होती. तेव्हा फोटो आणि व्हिडिओ खराब झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे स्वप्नील यांनी ते सर्व दुरुस्त करून देतो असे सांगितले.

लग्नाचे फोटो न देणे फोटोग्राफरच्या अंगाशी; दंड म्हणून द्यावे लागणार दोन लाख रुपये!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : लग्नाचे फोटो-व्हिडिओ बनवून देण्यासाठी पैसे घेऊनही काम पूर्ण न करणे फोटोग्राफरला चांगलेच भोवले आहे. संबंधित जोडप्याला कराराची रक्कम 85 हजार रुपये परत देण्यात यावेत. तसेच जोडप्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असून त्यांच्या निराशेबद्दल एक लाख रुपये, तक्रारीच्या खर्चापोटी दहा रुपये आणि हार्ड डिस्कसाठी नऊ हजार 549 हजार रुपये द्यावेत, असा आदेश पुणे ग्राहक आयोगाने दिला आहे.

UPSC ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे विद्यापीठाच्या निकालाकडे; काय आहे कारण?​

दंड आणि कराराच्या रकमेसह दोन लाख चार हजार 549 रुपये फोटोग्राफरला त्या जोडप्याला द्यावे लागणार आहेत. पुणे जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितिजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी विश्‍वजित बारावकर (रा. आंबेठाण चौक, चाकण) यांनी स्वप्नील दत्तात्रेय निंबाळकर (रा. कोथरूड ) यांच्याविरुद्ध आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराचे मे 2017 मध्ये लग्न होते. लग्नाच्या विधीचे सर्व फोटो आणि व्हिडीओग्राफी करण्याचे काम विश्‍वजित यांनी स्वप्नील यांना 85 हजार रुपयांना दिले होते.

कांदा चोरी करणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ७ लाखाचा मुद्देमाल जप्त​

फोटो आणि व्हिडिओ झाले होते खराब :
लग्नाच्या दिवशी काढलेल्या फोटोंची तक्रारदारांनी स्वप्नील यांना भेटून पडताळणी केली होती. तेव्हा फोटो आणि व्हिडिओ खराब झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे स्वप्नील यांनी ते सर्व दुरुस्त करून देतो असे सांगितले. मात्र ते दुरुस्त करून दिले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराने ओळखीच्या संगणक तज्ज्ञाकडून फोटो आणि व्हिडिओ दुरुस्त करून घेतले. त्यासाठी त्यांना नऊ हजार 549 रुपये खर्च आला. हे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी स्वप्नील यांना दिले. तरीही त्यांनी कराराप्रमाणे अल्बम आणि व्हिडिओ बनवून दिला नाही.

डीएसके प्रकरण : उलाढालीची कुंडली सादर करा; तपास यंत्रणेला कोर्टाने दिली शेवटची संधी​

महत्त्वाच्या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ मिळालेच नाही :
तक्रार दाखल केल्यानंतर मंचाकडून नोटीस पाठवूनही स्वप्नील हजर झाले नाहीत. तक्रारदाराचे म्हणणे मंचाने ऐकून घेतले. तक्रारदाराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचे साक्षीदार असलेले फोटो आणि व्हिडिओ तक्रारदाराला दिले नाही, सदोष सेवा, कराराचा भंग करण्यात आला. यावरून अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब असल्याचे आयोगाने निकालात नमूद केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top