
पुणे - ‘डेटा, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), क्वांटम कॉम्प्युटिंग अशा तंत्रज्ञानामुळे जग बदलणार असून उत्तम मनुष्यबळ निर्माण करून नव्या लाटेत आपल्याला पुढे जाता येईल. यामुळे डिजिटल बदलांची त्सुनामी येणार आहे. त्यामुळे डिजिटल दरी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बदलांना सामोरे जाण्यासाठी एमकेसीएलने आवश्यक पावले उचलावीत,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.