
डी. के. वळसे पाटील
मंचर : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे आंबेगाव तालुकाप्रमुख आणि मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी आपल्या तालुका प्रमुखपदाचा राजीनामा शुक्रवारी (ता. २७) शिवसेना संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्याकडे सुपूर्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गांजाळे हे पक्षाच्या कार्यक्रमांपासून अलिप्त होते. विशेषतः मंचर येथे त्यांनी केलेल्या उपोषणाच्या वेळी पक्षाचा बॅनर न वापरणे, ही बाब चर्चेचा विषय बनली होती. तेव्हापासूनच "जय महाराष्ट्र" करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.