....अखेर काँग्रेसचं ठरलं! अंकिता पाटलांचा पत्ता कट, 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर कोणाला पाठवायचं, याचं नाव अखेर जिल्हा काँग्रेसने सोमवारी (ता.१८) निश्चित केले आहे. या समितीवरील सदस्यत्वासाठी पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांना स्थायी समितीवर पाठविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर कोणाला पाठवायचं, याचं नाव अखेर जिल्हा काँग्रेसने सोमवारी (ता.१८) निश्चित केले आहे. या समितीवरील सदस्यत्वासाठी पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांना स्थायी समितीवर पाठविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. यामुळे माजी सहकारमंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांची स्थायी समितीवर जाण्याबाबतचा पत्ता कट झाला आहे.    

झेडपीच्या स्थायी समितीच्या सदस्यपदाची एकच जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे या एकासाठी काँग्रेसने झुरंगे यांचे नाव अंतिम केले आहे. याच समितीवरील दुसरी रिक्त जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसने फक्त काँग्रेसच्या एकाच जागेचे नाव निश्चित केले असल्याचे काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष आणि पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी आज (ता. १८) सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Datta Zurange name is final for ZP standing committee