
पुणे : ‘‘देशी गोवंशाच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम करण्याबरोबरच त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याचे काम करावे. देशी गाईंबाबत समाजात प्रेम, आत्मीयता असून ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे देशी गायींबाबत आज विविध ठिकाणी संशोधन होत आहेत,’’ असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.