भारतीय मानक ब्युरो उपसमितीच्या अध्यक्षपदी डॉ. दत्तात्रय कुटे

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उपसमितीच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुद्रणालयाचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय कुटे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. दत्तात्रय कुटे
डॉ. दत्तात्रय कुटेSakal

पुणे : प्रिंटिंग मशिनरीची मानके निश्चित करणाऱ्या भारतीय मानक ब्युरो, उपभोक्ता मामले, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उपसमितीच्या अध्यक्षपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) मुद्रणालयाचे व्यवस्थापक व परीक्षा विभागाचे विशेष कार्याधिकारी डॉ. दत्तात्रय कुटे यांची निवड करण्यात आली आहे.

या समितीवर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ असणाऱ्या उद्योग, उपभोगता, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींची नावे या समितीवर नामनिर्देशन केली जातात. डॉ. कुटे यांनी छपाई तंत्रज्ञानामधील व्यवस्थापन विषयात संशोधन केलेले असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधक पत्रिकेत शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत.

डॉ. दत्तात्रय कुटे
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा ढकलल्या पुढे

तसेच, त्यांना छपाई तंत्रज्ञानमधील व्यवस्थापन विषयात पुणे विद्यापीठाची पीएच.डी पदवी प्रदान केली आहे. डॉ. कुटे यांना वीस वर्षांहून अधिक काळ छपाई तंत्रज्ञान व प्रशासकीय काम केले आहे. थॉमसन प्रेस, ऍफनिटी एक्स्प्रेस आदी देशातील विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. मागील १३ वर्षांपासून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत असून, विद्यापीठाच्या अधिसभेवर पाच वर्षांसाठी त्यांची निवडही झाली होती.

छपाई व पॅकेजिंग तंत्रज्ञान वेगाने बदलत असून, भारतातही हे बदल स्वीकारले जात आहेत. ‘आयएसआय’च्या धर्तीवर निश्चित केलेल्या मानांकनानुसार भारतीय प्रिंटिंग मशिनरीचे उत्पादन बीएसआयची मानके निश्चित केली जात आहेत. त्यानुसार जलद गतीने याचे स्टॅंडररायझेशन करण्याचा निश्चय समितीने केला असल्याचे कुटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com