esakal | दौंड - भीमा पाटस प्रकरणी अण्णा हजारे यांना साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णा हजारे

दौंड - भीमा पाटस प्रकरणी अण्णा हजारे यांना साकडे

sakal_logo
By
प्रफुल्ल भंडारी

दौंड : ज्येष्ठ समाजसेवक तथा `पद्मभूषण ` पुरस्काराचे मानकरी अण्णा हजारे यांच्याकडे दौंड तालुक्यातील सध्या बंद असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी प्रस्तावित आंदोलनास पाठबळ देण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे या साखर कारखान्याच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणीने पुन्हा जोर धरला आहे.

हेही वाचा: वर्क फ्रॅाम सोसायटीचा नवा ट्रेंड; पाहा व्हिडिओ

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी ८ सप्टेंबर रोजी राळेगण सिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत निवेदनाद्वारे पाठबळ देण्याची विनंती केली. दौंड तालुक्याचे आमदार म्हणून २०१९ मध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले राहुल कुल हे सलग २० वर्षे या कारखान्याचे चेअरमन आहेत. दौंड तालुक्याचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विद्यमान चेअरमन या कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन असून मागील पंधरवड्यापासून कारखान्याच्या कारभारावरून आरोप - प्रत्यारोप सुरू आहे.

हेही वाचा: नगरसेवकाच्या हत्येचा कट उधळला;पाहा व्हिडिओ

अण्णा हजारे यांना नामदेव ताकवणे यांनी कारखान्याची सद्यस्थिती सांगण्यासह गैरव्यवहाराची माहिती दिली. कारखान्याचे संगनमताने खासगीकरण करून तालुक्यातील सहकार मोडीत काढण्याचा डाव आहे. या प्रक्रियेत शेतकरी, सभासद आणि कामगार उध्दवस्त होऊ नये याकरिता कारखाना पुन्हा सुरू होणे महत्वाचे आहे. अण्णा हजारे यांनी कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशीची मागणी शासनाकडे लावून धरण्यासह कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकरी आणि सभासदांच्या आंदोलनास पाठबळ देण्याची विनंती निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

हेही वाचा: धीरज घाटे यांच्या खुनाच्या कटातील तिघांना शुक्रवारपर्यंत कोठडी

अण्णा हजारे यांनी कारखान्याच्या सभासदांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारले आहे. भ्रष्टाचर विरोधी लढ्याला त्यांनी पाठिंबा देत या बाबत जनआंदोलन उभारण्याची सूचना केल्याची माहिती नामदेव ताकवणे यांनी दिली.

loading image
go to top