
पुण्यातील दौंड इथं चौफुला कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. दौंड तालुक्यात चौफुलाची तीन कलाकेंद्र आहेत. यापैकी कोणत्या कलाकेंद्रात गोळीबार झाला हे स्पष्ट झालं नाही. पण यामध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याशी संबंधित व्यक्तीने गोळीबार केल्याचं म्हटलं जात आहे. या घटेनंतर यवत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.