

Bribery scandal hits Daund municipal administration
sakal
दौंड : दौंड नगरपालिकेतील लेखाधिकारी भाग्यश्री भालचंद्र येळवे ( वय २९ , हल्ली रा. रामदरा, लोणी काळभोर, मूळ नाझरी, जि. बीड) व लिपिक ओंकार संजय मेणसे ( वय ३७, रा. हुडको कॅालनी, शिरूर) यांच्याविरूध्द लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेला कंत्राटी पध्दतीने सुरक्षारक्षक आणि कुशल व अकुशल कामगार पुरविणार्या कंत्राटदाराकडे भाग्यश्री येळवे व ओंकार मेणसे यांनी लाच मागितली होती.