

Daund municipal councillor Rohit Patil's membership has been cancelled after his Kunbi caste certificate was declared invalid by the caste scrutiny committee.
Sakal
दौंड : दौंड नगरपालिकेचे नागरिक हित संरक्षण मंडळाचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील जागेच्या निवडणुकीसाठी त्यांनी जोडलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले. त्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एका आदेशाद्वारे सदस्यत्व रद्द केले आहे.