दौंड : मेडीकलमध्ये चोरी, १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड लंपास

दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तीन चोरटे दिसून आले आहेत.
crime
crimesakal

दौंड (पुणे) : दौंड शहराजवळील लिंगाळी (ता. दौंड) येथील युनिटी मेडीकेअर मध्ये झालेल्या चोरीत १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड चोरीस गेली आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तीन चोरटे दिसून आले आहेत.

दौंड पोलिसांनी आज (ता. ११) या बाबत माहिती दिली. लिंगाळी येथे दौंड महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वाराजवळील युनिटी मेडकेअर या औषध विक्री दुकानात ११ सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी ही चोरी झाली. पायी आलेल्या तीन चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडण्यासह शटर उचकटले.

crime
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ. नितीन करमळकर

दुकानाच्या समोरील व आतील बाजूच्या काउंटरमधील कुलूपबंद ड्रॅाव्हर उचकटून त्यामध्ये ठेवलेली १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. ११ सप्टेंबरला सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ही चोरी निदर्शनास आली.

औषध विक्रीतून आलेली रक्कम एकत्रित करून सदर रक्कम दुकानातील कर्मचाऱ्यांनी दुकानात ठेवली होती. दुकानाचे मालक दादा भाऊसाहेब लोणकर यांच्या फिर्यादीनुसार दौंड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तीन चोरटे दिसून येत असून ते २२ ते ३० वयोगटातील आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस शोध घेत आहेत. सहायक निरीक्षक तुकाराम राठोड या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

लिंगाळी मध्ये सोनोने हॅास्पिटलसमोर २४ सप्टेंबर २०१८ रोजी पल्लवी मेडीकल मध्ये अशाच प्रकारे चोरी होऊन ४ लाख ३४ हजार रूपयांची रोकड चोरीस गेली होती. पल्लवी मेडीकल मधील चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com