esakal | आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ. नितीन करमळकर
sakal

बोलून बातमी शोधा

dr nitin karmalkar

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी स्वीकारला. कुलपती कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोग्य विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा मानदंड डॉ. करमळकर यांच्याकडे देत सुपूर्द केला.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदी डॉ. नितीन करमळकर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी स्वीकारला. कुलपती कार्यालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोग्य विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा मानदंड डॉ. करमळकर यांच्याकडे देत सुपूर्द केला. 

कोण आहे टिक-टॉक स्टार पुजा चव्हाण?

डॉ. करमळकर म्हणाले, ‘आरोग्य विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यात असून आरोग्य क्षेत्राशी निगडित काम करण्याची संधी मिळणार आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाबरोबर विद्यार्थी केंद्री उपक्रम आणि संशोधनाचे कामकाज विद्यापीठातून यापुढे घडावे, यासाठी प्रयत्न केले जातील.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. करमळकर हे सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात बीएस्सी केले. त्यानंतर त्यांनी एम.एस्सीसाठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. ‘पेट्रोग्राफी जिओकेमेस्ट्री ऑफ अल्ट्रामफाइट्‌स फ्रॉम पार्टस ऑफ लडाख हिमालय (विथ रेफ्रन्स टू क्रोमॅटिक मिनरलायझेशन)’ विषयात पीएच.डी प्राप्त केली.

पुणे तेथे काय उणे; इथं प्रेम पत्रंही लिहून मिळतात

याच विषयाशी निगडित बाबींवर त्यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनीत तसेच जर्मनीत संशोधन केले. पर्यावरण, भूगर्भशास्त्र, भूरसायनशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. डॉ. करमळकर यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची सुत्रे स्वीकारली, त्याप्रसंगी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top