

Major excise raid in Daund and Indapur leads to the seizure of fake liquor worth ₹3 lakh
Sakal
दौंड : पुणे जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दौंड व इंदापूर तालुक्यात केलेल्या कारवाईत तीन लाख रूपये मूल्य असलेला बनावट मद्याचा साठा जप्त केला आहे. दोन दोन सख्या भावांसह एकूण तीन तरूणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर १७ नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महामार्गावरून संशयास्पदरित्या जाणार्या मारूती इको मॅाडेल वाहनाची थांबवून तपासणी केली. त्यामध्ये गोवा येथे निर्मित आणि राज्यात प्रतिबंधित असलेल्या मद्याचे बॅाक्स आढळून आले.