

Daund-Kashti Line Doubling Work
Sakal
पुणे : पुणे रेल्वे विभागातील दौंड व काष्टी स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी चार ते २५ जानेवारीदरम्यान नॉन-इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. यासाठी रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने १८ हून अधिक गाड्या रद्द केल्या असून, काहींचा मार्ग बदलेला आहे.