

86 Candidates to Contest for 26 Corporator Seats in Daund
Sakal
दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाकरिता सहा तर सव्वीस सदस्यपदांकरिता एकूण ८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या नागरिक हित संरक्षण मंडळात मुख्य लढत होत आहे. दौंड नगरपालिकेच्या टाउन हॅाल कार्यालयात २१ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. जनतेतून थेट निवडून द्यावयाचे नगराध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असून त्याकरिता नऊ महिलांनी एकूण तेरा अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सात उमेदवारी अर्ज मागे घेतले गेल्याने नगराध्यक्षपदाकरिता सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.