दौंड : दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका ट्रक मधून तब्बल चौपन्न लाख रूपये मूल्य असलेला प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यातून या गुटख्याची वाहतूक दौंड मार्गे अहिल्यानगर शहराकडे प्रस्तावित होती. .पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी या बाबत माहिती दिली. बारामती - दौंड - नगर राष्ट्रीय महामार्गावरील गोल राउंड परिसरात मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. एका ट्रक मधून गुटख्याची वाहतूक दौंड मार्गे अहिल्यानगर कडे केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणार्या ११२ या क्रमांकावर देण्यात आली होती. .त्यानुसार दौंड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या पथकाने खातरजमा करून गुटख्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक (क्रमांक के. ए. - २९, ए - २५८८) ताब्यात घेतला. ट्रकमध्ये एकूण १४१ गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटख्याचे पु़डे आढळून आले. जप्त केलेल्या गुटख्याचे मूल्य ५४ लाख ९९ हजार ८०० रूपये असून ट्रकचे मूल्य १० लाख रूपये, असा एकूण ६४ लाख ९९ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला..ट्रकचालकाचे नाव रवि अर्जुन होळकर (रा. कासुर्डी, ता. दौंड) असून त्याला अटक करण्यात आली आहे. ट्रकचालक हा बदली चालक असल्याने त्याला ट्रकमधील गुटखा कर्नाटक राज्यातून नेमका कोठून भरला याची माहिती नसल्याचे प्राथमिक तपासात पुढे आली आहे.दौंड पोलिस ठाण्यात अंमलदार पवन शंकर माने यांच्या फिर्यादीनुसार चालक रवि होळकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे..Naresh Mhaske : ठाणे, डोंबिवली, भाईंदर शहरांना जोडणाऱ्या जलवाहतुकीच्या कामांना गती द्या : खासदार नरेश म्हस्के .भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३ ( नशाकारक, अपायकारक औषधी द्रव्ये किंवा पदार्थ सेवन करण्यास देणे अथवा विक्री करणे), कलम २२३ ( लोकसेवकाच्या आदेशाची अवज्ञा करणे), कलम २७४ ( खाद्य किंवा पेय पदार्थ अपायकारक होईल अशा पध्दतीने भेसळ करणे), कलम २७५ ( अपायकारक खाद्यपदार्थांची विक्री करणे) आणि अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ मधील पाच कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..उप अधीक्षक बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे,सहायक निरीक्षक नागनाथ पाटील, उप निरीक्षक सुनिल उगले, रमेश कदम, हवालदार एस. डी. राऊत, नितीन बोराडे, निखील जाधव, अमीर शेख, पांढरे , महेश भोसले, अंमलदार संजय कोठावळे, पवन मानेस एच. एस. कुलकर्णी, रमेश कर्चे, फडणीस व नितीन दोडमिसे यांनी ही कारवाई केली. जप्त केलेला गुटख्याचा साठा अहिल्यानगर शहरात उतरविला जाणार होता, अशी माहिती मिळाल्याने दौंड पोलिस त्यादृष्टीने पुढील तपास करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.