Daund Pune Demu Fire : दौंड-पुणे डेमू रेल्वेमध्ये लागली आग, प्रवासी टॉयलेटमध्ये अडकला अन्...

Daund Pune Demu Fire : दौंड-पुणे डेमू रेल्वेमध्ये लागली आग, प्रवासी टॉयलेटमध्ये अडकला अन्...

या आगीमुळे प्रचंड धूर पसरल्याने प्रवाशांमध्य भितीचे वातावरण पसरले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ट्रेन पुणे स्थानकात आणण्यात आली. या ट्रेनने कामधंद्यासाठी दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. दररोज सकाळी या ट्रेनला खूप गर्दी असते.
Published on

दौंडवरुन पुण्याला निघालेल्या डेमू ट्रेनमध्ये अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट उडाली. यात एक व्यक्ती टॉयलेटमध्ये अडकून राहिल्याने त्याला दरवाजा तोडून सुखरुप बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार दौंड -पुणे ही डेमू ट्रेन मध्ये ०७:०५ वाजता दौंड वरून सुटून पुण्याला येत असताना ट्रेन च्या टॉयलेट मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती त्या टॉयलेट मध्ये एक व्यक्ती अडकून राहिला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com