दौंड रेल्वे स्थानकाचा पुणे विभागात समावेश करावा; खासदार सुप्रिया सुळे

दौंड रेल्वे स्थानकाचा सोलापूर ऐवजी पुणे विभागात समाविष्ठ करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सध्या या स्थानकावर सोलापूर व पुणे विभागाचे दुहेरी नियंत्रण आहे.
Supriya Sule
Supriya SuleSakal
Updated on
Summary

दौंड रेल्वे स्थानकाचा सोलापूर ऐवजी पुणे विभागात समाविष्ठ करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सध्या या स्थानकावर सोलापूर व पुणे विभागाचे दुहेरी नियंत्रण आहे.

दौंड - दौंड रेल्वे स्थानकाचा (Daund Railway Station) सोलापूर ऐवजी पुणे विभागात (Pune Division) समाविष्ठ (Included) करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. सध्या या स्थानकावर सोलापूर व पुणे विभागाचे दुहेरी नियंत्रण आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची भेट घेत मतदारसंघातील रेल्वेसंबंधी प्रलंबित विषयांवर चर्चा केली. दौंड - पुणे लोहमार्गावर पाटस (ता. दौंड) स्थानकाच्या आधी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची सुरू होते मात्र दौंड स्थानकाचा सोलापूर विभागात समावेश आहे. दौंड - सोलापूर - वाडी आणि दौंड - नगर - येवला ( जि . नाशिक ) पर्यंतच्या मार्गांचा सोलापूर विभागात समावेश आहे.

Supriya Sule
पुणे : रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा

दौंड वरून जाणाऱ्या पुणे - दौंड - बारामती रेल्वे खंडाचा पुणे विभागात समावेश आहे. दौंडपासून सोलापूर रेल्वेस्थानकाचे अंतर १८७ किलोमीटर तर पुण्याचे अंतर अवघे ७५ किलोमीटर आहे. प्रशासकीय, भौगोलिक, आर्थिकदृष्ट्या प्रवासी आणि नागरिकांना सोलापूर पेक्षा पुणे विभाग सोईचा असल्याने प्रशासनाने दौंडचा समावेश पुणे विभागात करण्याची मागणी करण्यात आली.

दौंड मध्ये रखडलेल्या तिसर्या भुयारी मार्गाचे (कुरकुंभ मोरी) तातडीने पूर्ण करणे, दौंड मध्ये केंद्रीय विद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, पुणे - दौंड विभागास उप नगरीय रेल्वेचा दर्जा देणे, इलेक्ट्रिक लोको शेडचे ठप्प झालेले काम पूर्ववत करणे आणि रेल्वेच्या पडीक जागांमध्ये उद्याने तयार करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार व रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रवीण शिंदे या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com