

Five masked men loot two bungalows in Daund and Sonwadi; gold and cash worth ₹6 lakh stolen.
Sakal
दौंड -अहिल्यानगर - मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील सोनवडी ( ता. दौंड) लोखंडे वस्ती येथे पहाटे दत्तात्रेय सपकाळ यांच्या बंगल्यावर दरोडा पडला. ओढ्याजवळ असलेल्या बंगल्याच्या बाजूचे लाकडी दार उचकटून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. खोलीमधील लाकडी कपाटाचे ड्रॅावर व लॅाकरचे कुलूप तोडण्यात आले. कपाटातील किमान पाच तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व एक लाख रूपयांची रोकड चोरून नेली. श्री. सपकाळ यांची कांद्याची व कपाशीची पट्टी असलेली रोकडच चोरीला गेली आहे. बंगल्याच्या मागील बाजूच्या संरक्षक जाळ्याच्या लोखंडी तारा तोडून दरोडेखोरांनी गोदामात देखील उचकापाचक केली.