

SRPF 71st Passing Out Parade Held in Daund
Sakal
दौंड : युध्द आता सीमेवर लढले जात नसून अंतर्गत यादवी निर्माण करून लढले जात आहे. राज्य राखीव पोलिस दलातील नवप्रविष्ठ पोलिसांना अशा परिस्थितींशी सामना करण्यास प्रशिक्षित करून सज्ज करण्यात आले आहे. नवप्रविष्ठांनी सदैव राष्ट्रहितासाठी कर्तव्य बजवावे, असे आवाहन राज्य राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. दौंड शहरात राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सात येथील कवायत मैदानावर ७१ या सत्राच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना विजयकुमार मगर यांनी हे आवाहन केले.