Bhigwan Kidnapping Case : भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणी महिन्याभरापासून आरोपींच्या संपर्कात, पोलिसांची माहिती

Bride kidnapped Before Wedding : आरोपींनी आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट फेकून तरुणीला जबरदस्तीने चारचाकीत बसवून पळ काढला.आरोपी दोघे सख्खे भाऊ असून पीडितेसोबत त्यांची आधीपासून ओळख आणि संपर्क होता.विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhigwan Kidnapping Case : भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणी महिन्याभरापासून आरोपींच्या  संपर्कात, पोलिसांची माहिती
Updated on

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एका २१ वर्षीय तरुणीचे भररस्त्यात अपहरण झाल्याची खळबळजनक घटना १७ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ही घटना लग्नाच्या खरेदी करून घरी परतत असताना घडली असून तरुणीचे लग्न २२ फेब्रुवारीला होते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला आणि भिगवण बंदची हाक दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com