
Daund Water Management
Sakal
प्रकाश शेलार
खुटबाव : दौंड (जि. पुणे) तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात तसेच मुळा मुठा व भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याना स्वयंचलित बॅरेजेस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली. यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला सचिव संजय बेलसरे, कार्यकारी संचालक हनुमंत गुनाले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.