Daund Crime : पत्नी-मुलांनी मिळून शेतकऱ्याचा केला खून; पोलिस तपास सुरू!

Farmer Assault : नानवीज ( ता. दौंड) येथे मद्यपान करणार्या शेतकर्यास मरेपर्यंत मारहाण करणार्या पत्नी व मुलाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून करून शेतकर्याने आत्महत्या केल्याचा बनाव पत्नी व मुलाने केला होता. परंतु सहा महिन्यानंतर वैद्यकीय अहवाल व सखोल तपासानंतर सत्य समोर आले.
Daud police probe family assault after farmer beaten to death

Daud police probe family assault after farmer beaten to death

sakal

Updated on

दौंड : नानवीज येथे २ मे २०२५ रोजी नदीकाठी असणार्या शेतातील काम संपवून दुपारी मद्यपान करून घरी आलेल्या दत्तात्रेय उर्फ आबासाहेब माणिक पाटोळे ( वय ४७, रा. नानवीज) यांचे कुटुंबीयबरोबर वाद झाले. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यांचा मुलगा संस्कार आबासाहेब पाटोळे ( वय १८) व पत्नी उषा आबासाहेब पाटोळे ( वय ३८) यांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. खुनानंतर आबाासाहेब पाटोळे यांना तत्काळ दवाखान्यात न नेता संस्कार व उषा पाटोळे यांनी त्यांच्या अंगावरील कपडे काढून अंघोळ घालून दुसरे कपडे घातले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com