

Daund–Manmad Rail Corridor Upgraded, 15-Minute Time Saving for Passengers
sakal
पुणे: पुणे रेल्वे विभागातील दौंड ते मनमाड दरम्यान सुमारे २३६ किलोमीटर मार्गावर दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. याचा फायदा प्रवासी व मालगाड्यांना होणार आहे. या मार्गावर दैनंदिन धावणाऱ्या ३० हून अधिक प्रवासी रेल्वेच्या वेळेत सुमारे १२ ते १५ मिनिटांची बचत होणार आहे तर ८ ते १० प्रवासी गाड्याचे क्रॉसिंग टळणार आहे. शनिवारी (ता. ३०) विसापूर-रांजणगाव -सरोळा या मार्गाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त हे पाहणी करणार आहेत. त्यांनी या मार्गाला मंजुरी दिल्यावर हा मार्ग वापरात येईल.