Salim Kutta : दाऊद टोळीतील गुंड सलीम कुत्ता सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात

भाजपचे नेते आणि आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबतचा एक फोटो आणि व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
Salim Kutta
Salim Kuttasakal

पुणे - नाशिकमधील शिवसेनेचे (ठाकरे गट) शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झालेला दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड महंमद सलीम मीर शेख ऊर्फ सलीम कुत्ता गेल्या सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात आहे. सहा वर्षांत एकदाही त्याची जामिनावर किंवा पॅरोलवर मुक्तता झाली नसल्याची माहिती कारागृह प्रशासनाने सोमवारी (ता. १८) दिली.

भाजपचे नेते आणि आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबतचा एक फोटो आणि व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे सलीम कुत्ता आणि बडगुजर यांच्यात संबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र राणे यांनी सादर केलेली ध्वनिचित्रफीत २०१६ पूर्वीची असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणात सलीम कुत्ता याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येरवडा कारागृहात दाखल करण्यापूर्वी सलीम याला नाशिक कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यावेळी तो दहा दिवस संचित रजेवर (पॅरोल) मुक्त होता. त्यामुळे विधानसभेत सादर करण्यात आलेली ध्वनिचित्रफीत त्यावेळची असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कुत्ता २०१६ पासून येरवडा मध्यवर्ती कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. या काळात त्याची एकही दिवस कारागृहातून मुक्तता झाली नाही. त्याची मुलगी आणि जावई २०२० मध्ये अधिकृत परवानगी घेऊन त्याला भेटले होते, अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली.

कोण आहे सलीम कुत्ता? -

सलीम हा मूळचा तमिळनाडूमधील तंजावरधील कुट्टा गावाचा रहिवासी आहे. ९० च्या दशकात तो मुंबईत आला होता. तेथे तो दाऊद टोळीतील गुंड महंमद डोसा याच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आल्या. त्याच्याविरुद्ध कुलाबासह काही पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. मुंबईमध्ये १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

का पडले कुत्ता नाव -

महंमद सलीम मीर शेख याची गुन्हेगारी जगतात क्रूर अशी ओळख होती. आक्रमकतेमुळे त्याला सलीम कुत्ता असे टोपणनाव पडले. कुत्ता नावामुळे आपली बदनामी होते असा दावा करून त्याने टाडा न्यायालयात स्वतःच्या नावातून कुत्ता हा शब्द वगळण्याची विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com