esakal | Coronavirus : दिवस 'ब्लॅक टी’वर

बोलून बातमी शोधा

Milk

‘गोकुळ’चे साडेतीन लाखापैकी केवळ २४ हजार लिटर दूध काही तुरळक भागात विकले गेले आहे; तसेच उद्याही काही प्रमाणात दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता आहे.
- विजय ढेरे, वितरक, गोकुळ दूध

Coronavirus : दिवस 'ब्लॅक टी’वर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - जनता कर्फ्यूमुळे पुण्यातील दूध वितरणव्यवस्था कोलमडली. अनेक वितरकांनी दूध न उचल्याने तसेच किराणा मालाची दुकानेही बंद असल्याने अनेकांना दूध मिळू शकले नाही. परिणामी मोठ्यांना आजचा दिवस ब्लॅक टी वरच काढावा लागला, तर लहान मुलांचे हाल झाले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. मात्र, या वेळी कर्फ्यू सुरू होण्यापूर्वी दूध मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार काही तुरळक विक्रेत्यानी दूध विक्री केली. रविवारी सकाळी सातच्या आधी घरातून बाहेर पडून दूध घेण्यासाठी अनेकजण गेले असता त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
जनता कर्फ्यूमुळे दूधपुरवठा बंद असणार आहे, अशी पूर्वकल्पना विक्रेत्यांकडून दिलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण दिवस दुधाविना घालवावा लागला. यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे हाल झाले.

Coronavirus : आतापर्यंत पुण्यात तब्बल एवढ्या जणांचे ‘होम क्वारंटाइन’