Undawadi Theft
sakal
उंडवडी - भरदुपारी दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी कारखेल (ता. बारामती) हद्दीतील लळईवस्ती येथे बाळासाहेब कृष्णा मांढरे यांच्या घराचा लोखंडी दरवाज्याचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून तब्बल दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने तसेच २५ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. ही घटना आज (ता. ९) दुपारी एकच्या दरम्यान घडली.