
पुणे / सिंहगड रस्ता : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव येथील रेणुका नगरीमधील गजानन ज्वेलर्स दुकानात तीन चोरट्यांनी भरदिवसा शस्त्रांचा धाक दाखवत पाच तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. यावेळी चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.