महिला, बालकल्याणच्या योजनांच्या अर्जांसाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांसाठी अर्ज करण्यास 23 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत आज संपली. त्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करता न आल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आल्या.

पुणे - जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून राबविण्यात येत असलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठी आणखी आठवडाभर मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांना आता येत्या 31 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्ह्यात अतिवृष्टी, चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. यामुळे अनेक इच्छुकांना याआधीच्या मुदतीत अर्ज सादर करता आले नाहीत. याशिवाय शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले. पुणे जिल्हा परिषदेच्या व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठी यंदा महालाभार्थी हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत होते; परंतु त्यात येत असलेल्या अडचणींमुळे अनेक जण अर्ज करण्यापासून वंचित राहत होते. त्यामुळे ऑनलाइनच्या जोडीलाच ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांसाठी अर्ज करण्यास 23 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत आज संपली. त्यानंतरही तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करता न आल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आल्या. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती पूजा पारगे यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline for applications for Women and Child Welfare Schemes extended till 31st October