
Deadly Slope at Gangadham Finally Gets Attention – ₹18 Cr Allocated
Sakal
पुणे : गंगाधाम चौकातील तीव्र उताराच्या कामाला महापालिकेकडून लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. या कामासाठी जुलै महिन्यात स्थायी समितीने नऊ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती. आता मात्र काम सुरू होण्यापूर्वीच या खर्चामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. संबंधित कामासाठी महापालिकेला आता १८ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या दोन दिवसांत या कामासाठीचे कार्यादेश निघणार आहेत.