esakal | मृत्यूनंतरही कोरोना बाधित रुग्णांबाबत आता समाजाची भूमिका वेगळी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Virus

कोरोनाने अनेक क्षेत्रात उलथापालथ झाली तशी मानवी संवेदनांबाबतही ती घडू लागली आहे. मृत्यूनंतरही कोरोना बाधित रुग्णांबाबत आता समाजाची भूमिका वेगळी होऊ लागली आहे, याचे प्रत्यंतर आता येऊ लागले आहे. बारामतीतही आता अशी स्थिती निर्माण होऊ पाहते आहे. 

मृत्यूनंतरही कोरोना बाधित रुग्णांबाबत आता समाजाची भूमिका वेगळी

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - कोरोनाने अनेक क्षेत्रात उलथापालथ झाली तशी मानवी संवेदनांबाबतही ती घडू लागली आहे. मृत्यूनंतरही कोरोना बाधित रुग्णांबाबत आता समाजाची भूमिका वेगळी होऊ लागली आहे, याचे प्रत्यंतर आता येऊ लागले आहे. बारामतीतही आता अशी स्थिती निर्माण होऊ पाहते आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मध्यवर्ती अमरधाम स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार होऊ नयेत, अशी मागणी करणारे पत्र बारामती नगरपालिकेचे नगरसेवक सुनील सस्ते यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. 

मेगा भरती! पुणे जिल्हा परिषद दीड हजार रिक्त पदे भरणार!

काल कोरोनाबाधित तर त्या अगोदर कोरोना संशयित असलेल्या मृतदेहावर नगरपालिकेच्या वतीने अमरधाम या स्मशानभूमीध्ये अंत्यसंस्कार केले गेले. मात्र या परिसरातील नागरिकांचा या ठिकाणी कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध असल्याचे सस्ते यांनी या पत्रात नमूद केले. अमरधाम ही बारामतीतील मध्यवर्ती स्मशानभूमी आहे, येथे अंत्यसंस्कारासह सावडण्याचाही कार्यक्रम होतो. या स्मशानभूमीच्या आसपास रस्तेही मोठ्या प्रमाणावर आहेत, त्या मुळे येथे कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करु नये, अशी मागणी केली आहे. 

बेरोजगार आहात? काळजी करू नका; ट्रेनिंगदरम्यान मिळणार दरमहा १० हजार अन् त्यानंतर नोकरीही!

या भागातील महिलांसह पुरुषांनीही उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी किरणराज यादव यांचीही भेट घेतली. दरम्यान ही स्थिती या दोन्ही अधिका-यांनी ऐकून घेतली आहे. मात्र सुनील सस्ते यांनी आता थेट अजित पवार यांनाच पत्र देत या स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करु नयेत, अशी मागणी केली आहे. 

या मागणीनंतर आता प्रशासन या वर नेमका काय निर्णय घेणार या कडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Edited By - Prashant Patil