मच्छीमारी करताना तो नदी पात्रात उतरला अन्...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 December 2019

सलग दोन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके जगवण्यासाठी नदीपात्रालगत वीजखांब उभारण्यात आला आहे. त्यामुळे उच्चदाब वीजवहिनी आणि लघुदाब वीजवाहिनी नदीपात्रातून गेली आहे. त्याला कसल्याही प्रकारचे संरक्षण नसल्याने; तसेच उघड्यावर दिलेल्या जोडामुळे तारांमधील विद्युतप्रवाह पाण्यामध्ये उतरून मच्छीमार तरुणाचा मृत्यू झाला

इंदापूर : अगोती नंबर एक (ता. इंदापूर) येथे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे लालू मुकुंद ठोसर (वय 25, रा. भीमानगर, ता. माढा, जि. सोलापूर) या मच्छीमाराचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. 

बिबटयाला हुसकविण्यासाठी देशी जुगाड

सलग दोन वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीमुळे उभी पिके जगवण्यासाठी नदीपात्रालगत वीजखांब उभारण्यात आला आहे. त्यामुळे उच्चदाब वीजवहिनी आणि लघुदाब वीजवाहिनी नदीपात्रातून गेली आहे. त्याला कसल्याही प्रकारचे संरक्षण नसल्याने; तसेच उघड्यावर दिलेल्या जोडामुळे तारांमधील विद्युतप्रवाह पाण्यामध्ये उतरून मच्छीमार तरुणाचा मृत्यू झाला. सहायक फौजदार दत्तात्रय जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. लालू ठोसर याचा मृत्यू नदीपात्रात वीजप्रवाह उतरल्यामुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्यांनी काढला.

अन् नागाला पकडणं पडलं महागात

याबाबत महावितरणचे लोणी देवकरचे शाखाधिकारी महेश पवार म्हणाले की, ''नदीपात्रात पाणी आल्यानंतर वीजजोड काढले जातात. मात्र हा जोड परस्पर कोणीतरी जोडल्यामुळे ही घटना घडली असण्याची शक्‍यता आहे.''

रोहित पवारांनी घेतला पुढाकार, आता युवा आमदारांना घेऊन...

महावितरणचे तालुका अभियंता रघुनाथ गोफणे म्हणाले की, ''झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. पंचनाम्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. विजेचा बेकायदा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of fishermen due to electricity current passed into river