esakal | रोहित पवारांनी घेतला पुढाकार, आता युवा आमदारांना घेऊन...
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar

विधानसभेत सध्या अनेक युवा आमदार असून, त्यांच्या कामाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. राजकारणाचा अनुभव नसलेल्या या युवा आमदारांना सर्वकाही शिकायचे असून, लांब पल्ला गाठायचा आहे. तसेच युवा व जनतेच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्षभेद बाजूला ठेवून हा ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. रोहित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

रोहित पवारांनी घेतला पुढाकार, आता युवा आमदारांना घेऊन...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कर्जत-जामखेडसारख्या कठीण मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे  आमदार रोहित पवार यांनी आता सर्वपक्षीय युवा आमदारांची मोट बांधण्यात सुरवात केली असून, 'यंग एमएलए' ग्रुप स्थापन केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधानसभेत सध्या अनेक युवा आमदार असून, त्यांच्या कामाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. राजकारणाचा अनुभव नसलेल्या या युवा आमदारांना सर्वकाही शिकायचे असून, लांब पल्ला गाठायचा आहे. तसेच युवा व जनतेच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. त्यामुळे सर्व पक्षभेद बाजूला ठेवून हा ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. रोहित पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

आता अक्षय कुमारही देतोय अमित शहांना सल्ले!

सुरुवातीला महाआघाडीच्या युवा आमदारांना एकत्रित करून यंग एमएलए ग्रुप स्थापन केला जाईल. त्यामार्फत मुख्यमंत्री, ज्येष्ठ आमदार, ज्येष्ठ नेत्यांचे मागर्दशन शिबिर घेण्यात येईल. गरज पडल्यास परदेशातही अभ्यास दौरे आयोजित केले जाणार आहेत. राज्याच्या व युवकांच्या समस्या समजाऊन घेतल्या जातील. राज्यातील 40 ते 45 टक्के लोकसंख्या 30 वर्षांखालील तरुणांची आहे. युवकांचे प्रश्‍न वेगळे आहेत. त्यांना पक्षाच्या राजकारणाशी काही देणे-घेणे नसते. रोजगार, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अद्यावत सोयी-सुविधा हे त्यांचे प्रधान्यक्रम आहेत. हे सर्व करीत असताना आपल्या देशाची मुख्य अर्थव्यवस्था शेतीवरच आधारित आहे. याचाही विसर पडू दिला जाणार नाही. शेतकऱ्यांचा विकास हासुद्धा आमच्या अजेंड्यावर राहणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

सायरस मिस्त्री पुन्हा होणार टाटा समुहाचे अध्यक्ष?; पुनर्नियुक्तीचा मार्ग मोकळा

भारताला दिशा देण्याचे सामर्थ्य युवकांमध्ये आहे. त्यादिशेने आमच्या ग्रुपमार्फत प्रयत्न केले जातील. सुदैवाने युवा सेना नेते आदित्य ठाकरे, आदिती तटकरे यांच्यासह अनेक युवा आमदार आघाडी सरकारमध्ये आहेत. आम्ही सर्वच युवा आमदार वेगळ्या पक्षाचे सदस्य असले तरी सकारात्मकरित्या खुल्या पद्धतीने चर्चा करीत असतो. आमच्यात पक्ष कधीच आडवा येत नाही. आजच्या काळाची गती लक्षात घेऊन वेगळे विचार मांडण्यासाठी अभ्यास केला जात आहे, असेही पवार यांनी सांगितले.

loading image