Pune Rain Update : पावसाच्या साचलेल्या पाण्यात अल्पवयीन मुलाचा मृत्यू

परिसरात काल सायंकाळी झालेल्या पावसात माळवाडी डीपी रोड क्रीडा संकुल लगत साचलेल्या पाण्यात पडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू
Pune Rain Update
Pune Rain Update Sakal
Updated on: 

हडपसर : परिसरात काल सायंकाळी झालेल्या पावसात माळवाडी डीपी रोड क्रीडा संकुल लगत साचलेल्या पाण्यात पडून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. विजेचा धक्का लागून हा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रोहीत सुभाष मंडालकर (वय ११, रा. साडेसतरानळी, डीपी रोड, मनपा शाळेसमोर, हडपसर ) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.११) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास, डीपी रोड क्रीडा संकुल शेजारील चौकामध्ये सासलेल्या पाण्यामध्ये मुलाचा बुडू मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली. नक्की मृत्यू कशाने झाला आहे, हे शवविच्छेदन झाल्यावरच समजू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com