पुणे : कोंढव्यात भरधाव टँकरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसाक सय्यद हे रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोंढव्यातील कौसरबाग येथील युनीटी पार्कजवळून पायी जात होते. ते वॉशिंग सेंटरजवळ आले असताना अचानक पाठीमागून भरधाव आलेल्या पाण्याच्या टॅंकरने त्यांना धडक दिली

पुणे : पायी जाणाऱ्या तरुणास भरधाव टॅंकरने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजता कोंढव्यातील कौसरबाग येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इसाक मुस्तफा सय्यद (वय 20, रा. कौसरबाग, कोंढवा) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसाक सय्यद हे रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोंढव्यातील कौसरबाग येथील युनीटी पार्कजवळून पायी जात होते. ते वॉशिंग सेंटरजवळ आले असताना अचानक पाठीमागून भरधाव आलेल्या पाण्याच्या टॅंकरने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या सय्यद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

....म्हणून 'त्याने' बहिणीच्या पतीच्या डोक्यात कोयत्याने वार करून केला खून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of pedestrian in tanker collision in kondhwa Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: