पुणे : कोरोना रुग्णांच्या मृत्यूंनी २ हजाराचा आकडा ओलांडला!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील १ हजार ३६१, पिंपरी-चिंचवड शहरातील ३७७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १५७, नगरपालिका क्षेत्रातील ६६ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डातील ७४ रुग्ण आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंनी शनिवारी (ता.१) दोन हजारांचा आकडा ओलांडला आहे. शनिवारी दिवसभरात ५४ मृत्यू झाले आहेत. यामुळे एकूण मृत्यूंची संख्या दोन हजार ३५ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात दोन हजार ७०९ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.

शनिवारच्या नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ५०६, पिंपरी चिंचवडमधील  ८४९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २३४, आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डातील मिळून १२० रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ८८ हजार ५८४ झाली आहे. शुक्रवारी (ता. ३१) रात्री ९ वाजल्यापासून शनिवारी (ता.१) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

कोरोनाचे उपचार घेणाऱ्या महिलेचा वॉर्डबॉयने केला विनयभंग; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार!​

आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील १ हजार ३६१, पिंपरी-चिंचवड शहरातील ३७७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १५७, नगरपालिका क्षेत्रातील ६६ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डातील ७४ रुग्ण आहेत.

दरम्यान, शनिवारी दिवसभरात ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २८ जण आहेत. याशिवाय पिंपरी-चिंचवडमधील १२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १४ आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून ५ जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death toll of Corona patients in the district has crossed two thousand