महावितरणाच्या केबलचा शॉक लागून भाजलेल्या महिलेचा मृत्यू

Death of woman burned by shock of MSEDCL cable.jpg
Death of woman burned by shock of MSEDCL cable.jpg
Updated on

पिंपरी : रस्त्यावर उघड्या पडलेल्या महावितरणाच्या केबलचा शॉक लागून पेट घेतलेल्या महिलेचा अखेर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे दुर्देवी मृत्यू झाला. सुप्रिया संजय खांडेकर (वय. 40 रा. नेवाळेवस्ती, चिखली) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकाराबाबत महावितरणच्या संबंधित आधिकाऱयावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 11 डिसेंबरपासून 

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नेवाळेवस्ती येथे रस्त्यावरच महावितरणाची मुख्य केबल उघडी पडलेली होती. वाहने जाऊन ती केबल कट झाली होती. शुक्रवारी (ता.15) सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुप्रिया या आपल्या मुलाला शाळेतून घरी आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी नेवाळेवस्ती येथे रस्त्यावरच उघड्या पडलेल्या केबलवर सुप्रिया यांचा पाय पडला. त्यांना विजेचा धक्का लागून
ठिणग्या उडाल्या. काही कळायच्या आतच त्यांच्या आंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्यात त्या सत्तर टक्के भाजल्या होत्या. त्यांना विशाल नेवाळे व किरण नेवाळे यांनी नागरिकांच्या मदतीने वायसीएम रूग्णालयात दाखल केले.

पुणेकरांनो महत्वाची बातमी : तक्रार नोंदवा थेट पोलिस अधिकाऱ्यांकडे, जाणून घ्या मोबाईल नंबर 

वायसीएम रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सुप्रिया यांना पुण्यातील ससून रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा प्राणज्योत मालवली. महावितरणच्या या बेजबाबदार कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, संबंधित आधिकाऱयांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. 

‘सकाळ’च्या वृत्तानंतर पुण्यातील 'या' चौकात झेब्रा क्रॉसिंग आणि गतिरोधक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com