पुणेकरांनो महत्वाची बातमी : तक्रार नोंदवा थेट पोलिस अधिकाऱ्यांकडे, जाणून घ्या मोबाईल नंबर

टीम ई-सकाळ
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

नागरीक व पोलिस यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ होऊन, नागरीकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक व्हावी, या उद्देशाने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतंत्र मोबाईल संच, मेमरी कार्ड, सीमकार्ड देण्याची संकल्पना मांडली होती.

पुणे : पिडीत महिला, वृद्ध नागरीक व तक्रारदार यांचा व पोलिसांचा सुसंवाद वाढावा, त्यांच्या तक्रारी, अडचणी वरिष्ठांपर्यंत पोचून त्यावर तत्काळ उपाययोजना व्हावी, यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त व पोलिस उपायुक्तांना स्वतंत्र मोबाईल संच देण्यात आले आहे. पुणे पोलिस प्रशासनातर्फे 45 मोबाईल संचचे वाटप करण्यात आले. पोलिस आयुक्त  डॉ. के. वेंकटेशम यांनी नागरीक व पोलिस यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ होऊन, नागरीकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक व्हावी, या उद्देशाने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतंत्र मोबाईल संच, मेमरी कार्ड, सीमकार्ड देण्याची संकल्पना मांडली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा सकाळचे मोबाईल एप

पोलिस उपायुक्त (मुख्यालय) विरेंद्र मिश्र, सहाय्यक पोलिस आयुक्त (अभियान) सुनील देशमुख यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली. त्यासाठी मिश्र यांनी मोबाईल कंपन्यांशी संपर्क साधला. त्यादृष्टीने कायमस्वरुपी लक्षात राहतील, असे 7823025231 ते 7823025275 हे मोबाईल क्रमांक घेण्यात आले. संबंधीत मोबाईल क्रमांक व 45 मोबाईल संचचे 5 पोलिस उपायुक्त, 10 सहाय्यक पोलिस आयुक्त व 30 पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलिस उपायुक्त सुनील देशमुख यांनी दिली.

तानाजी चित्रपटातील दृष्यावरून वाद उफाळला; संभाजी ब्रिगेडचा विरोध

पोलिस आयुक्तांचे मोबाईल नंबर असे

 • स्वप्ना गोरे - पोलिस उपायुक्त परिमंडळ 1 - 7823025231
 • शिरीष सरदेशपांडे - पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 - 7823025232
 • पौर्णिमा गायकवाड - पोलिस उपायुक्त परिमंडळ 3 - 7823025233
 • प्रसाद अक्कानवरु - पोलिस उपायुक्त परिमंडळ 4 - 7823025234
 • सुहास बावचे - पोलिस उपायुक्त परिमंडळ 5 - 7823025235

 सहाय्यक पोलिस आयुक्त - विभाग मोबाईल क्रमांक

 • प्रदीप आफळे - फरासखाना - 7823025236
 • रवींद्र रसाळ - लष्कर - 7823025237
 • सुधाकर यादव - विश्रामबाग - 7823025238
 • सर्जेराव बाबर - स्वारगेट - 7823025239
 • मच्छिंद्र चव्हाण - कोथरुड (प्रस्तावीत) - 7823025240
 • लक्ष्मण बोराटे - खडकी - 7823025241
 • रामचंद्र देसाई - येरवडा (प्रस्तावीत) - 7823025242
 • पोमाजी राठोड - सिंहगड - 7823025243
 • सुनील कलगुटकर - वानवडी - 7823025244
 • रिक्त पद - हडपसर - 7823025245

वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे मोबाईल क्रमांक

 • कल्पना जाधव - अलंकार - 7823025246
 • प्रतिभा जोशी - कोथरुड - 7823025247
 • सुनील पंधरकर - उत्तमनगर - 7823025248
 • मुरलीधर करपे - कोंढवा - 7823025249
 • प्रमोद पत्की - कोरेगाव पार्क - 7823025250
 • भरत जाधव - खडक - 7823025251
 • भागवत मिसाळ - खडकी - 7823025252
 • शंकर खडके - चंदननगर - 7823025253
 • अनिल शेवाळे - चतुःश्रृंगी - 7823025254
 • दिपक लगड - डेक्कन - 7823025255
 • देविदास घेवारे - दत्तवाडी - 7823025256
 • जगन्नाथ कळसकर - फरासखाना - 7823025257
 • सुनील तांबे - बंडगार्डन - 7823025258
 • कुमार घाडगे - बिबवेवाडी - 7823025259
 • वसंत कुंवर - भारती विद्यापीठ - 7823025260
 • संभाजी निंबाळकर - मार्केटयार्ड - 7823025261
 • संपत भोसले - मुंढवा - 7823025262
 • युनूस शेख - येरवडा - 7823025263
 • चंद्रकांत भोसले - लष्कर - 7823025264
 • क्रांतीकुमार पाटील - वानवडी - 7823025265
 • अशोक कदम - वारजे माळवाडी - 7823025266
 • गजानन पवार - विमानतळ - 7823025267
 • अरुण आव्हाड -विश्रांतवाडी - 7823025268
 • दादासाहेब चुडाप्पा - विश्रामबाग - 7823025269
 • बाळासाहेब कोपनर - शिवाजीनगर - 7823025270
 • बाळकृष्ण कदम - समर्थ - 7823025271
 • नंदकुमार बिडवई - सहकारनगर - 7823025272
 • नंदकिशोर शेळके - सिंहगड रोड - 7823025273
 • ब्रम्हानंद नाईकवाडी - स्वारगेट - 7823025274
 • रघुनाथ जाधव - हडपसर - 7823025275

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune people can make complaints to direct police officers