ख्रिसमसच्या दिवशीच होणार पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांची गैरसोय; 'या' गाड्या उद्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

उद्या 25 डिंसेबरला मध्य रेल्वेतर्फे पादचारी पुल उभारण्यासाठी ब्लाक घेणार आहे. त्यामुळे डोंबिवली ते कल्याण दरम्यानची रेल्वे गाड्या सकाळी सकाळी 9.45 पासून ते दुपारी 1.45 या वेळेत बंद केल्या आहेत. परिणामी लांबपल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्याचा मार्ग बदलण्यात आला.

पुणे : पुणे-मुंबई प्रवाशांची 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी गैरसोय होणार आहे. कारण, उद्या डेक्कन क्विन, सिंहगड एक्सप्रेस, कोल्हापुर सह्याद्री एक्सप्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या असून त्यांचे मार्ग बदलण्यात आल्या आहेत. डोंबिवली ते कल्याण स्थानका दरम्यान ठाकुर्ली स्थानकादरम्यान उद्या (ता.25) सकाळी 9.45 पासून ते दुपारी 1.45 पर्यंत पादचारी पुल उभारण्याचे काम मध्य रेल्वेकडून केले जाणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

पुणे-मुंबई मार्गाने उद्या प्रवास करणार आहात? मग ही बातमी वाचा

उद्या 25 डिंसेबरला मध्य रेल्वेतर्फे पादचारी पुल उभारण्यासाठी ब्लाक घेणार आहे. त्यामुळे डोंबिवली ते कल्याण दरम्यानची रेल्वे गाड्या सकाळी सकाळी 9.45 पासून ते दुपारी 1.45 या वेळेत बंद केल्या आहेत. परिणामी लांबपल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्याचा मार्ग बदलण्यात आला. या ब्लॉक दरम्यान, पुणे-मुंबई मार्गावर पुण्यातून धावणाऱ्या डेक्कन क्विन, सिंहगड एक्सप्रेस, कोल्हापुर सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई भुसावळ पॅसेंजर या गाड्या रद्द केल्या आहेत. कोल्हापुर - मुंबई सह्याद्दी एक्सप्रेस गाडी आज (ता.24) रद्द करण्यात आली असून उद्या(ता.25)कर्जत, पनवेल, दिवामार्गे धावणार आहे. उद्या ब्लॉकदरम्यान,कल्यण-कर्जत, कासारासाठी 20 मिनिटांनी तर सीएसटी आणि ठाणे,डोंबिवली दरम्यान 15 मिनिटांनी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे-भुसावाळ एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला असून दौंड-मनमाड मार्गे धावणार आहे. तर नांदेड एक्सप्रेस, नागर कोईल व हैद्राबाद एक्सप्रेस या गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गाने धावणार आहेत. कल्याणला जाणाऱ्या प्रवांसाठी दिवा येथे थांबा देण्यात येणार आहे. तसेच इतर काही गाड्यांना विविध थांब्यावर काही काळ थांबविणार आहे तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

‘पिफ’मध्ये १४ आंतरराष्ट्रीय चित्रपट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deccan Queen Sinhagad Express Kolhapur Sahyadri Express has been Cancelled Tomorrow on christmas day