‘पिफ’मध्ये १४ आंतरराष्ट्रीय चित्रपट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fourteen International Film in Piff

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील "वर्ल्ड कॉम्पिटिशन' या स्पर्धात्मक विभागातील चौदा चित्रपटांची नावे सोमवारी जाहीर करण्यात आली.

‘पिफ’मध्ये १४ आंतरराष्ट्रीय चित्रपट

पुणे - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधील "वर्ल्ड कॉम्पिटिशन' या स्पर्धात्मक विभागातील चौदा चित्रपटांची नावे सोमवारी जाहीर करण्यात आली. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी भारतीय चित्रपट विभाग आणि पिफ फोरमअंतर्गत होणारे कार्यक्रमदेखील या वेळी जाहीर केले. 

महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, सबिना संघवी, चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे व अभिजित रणदिवे, एमआयटीचे अमित त्यागी आदी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष, ही या महोत्सवाची "थीम' असून, या अंतर्गत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवासाठी यावर्षी 60 देशांमधून तब्बल 1900 चित्रपट प्राप्त झाले होते. त्यांपैकी निवडक 191 चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवादरम्यान चित्रपट रसिकांना मिळणार आहे. 

त्यातील जागतिक स्पर्धात्मक विभागातील चित्रपट अशी आहेत. द ह्युमरिस्ट (दिग्दर्शक : मायकल आयडोव्ह, देश : रशिया), मारिगेला (दिग्दर्शक : वॅगनर मॉरा, देश- ब्राझील), द पेंटेड बर्ड (दिग्दर्शक : वाक्‍लाव मारहॉल, देश : युक्रेन), द सायन्स ऑफ फिक्‍शन (दिग्दर्शक : जोसेफ अँगी नोएन, देश- इंडोनेशिया, मलेशिया, फ्रांस), मोजाइक पोर्टेट (दिग्दर्शक : झाई यिशांग, देश : चीन), द टीचर (दिग्दर्शक : डेनिस डेरकोर्ट, देश : जर्मनी, फ्रांस), टॉल टेल्स (दिग्दर्शक : अटिल झास्झ, देश : हंगेरी), सुपरनोव्हा (दिग्दर्शक : बर्तोझ कृलिक, देश : पोलंड), अ सन (दिग्दर्शक : मेहदी एम बार्सोइ, देश : ट्युनिशिया, फ्रांस, लेबनन, कतार), लीसाज टेल (दिग्दर्शक : अलेक्‍झांडर झोव्हना, देश : युक्रेन), होमवर्ड (दिग्दर्शक : नरिमन अलिव, देश : युक्रेन), बीनपोल (दिग्दर्शक : कान्टेमिर ब्लागॉव्ह, देश : रशिया), मार्केट (दिग्दर्शक : प्रदीप कुरबाह, देश : भारत), अडल्टस्‌ इन द रूम (दिग्दर्शक : कोस्टा गॅव्हर्स, देश- फ्रांस, ग्रीस) 

"पिफ फोरम'मध्ये होणारे कार्यक्रम  
- प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे मेकअप डिझायनर क्रिएटिंग ऍन इल्युजन या विषयावर व्याख्यान 
- चित्रपट साक्षरता या विषयावर समर नखाते, पंकज सक्‍सेना आणि अमित त्यागी यांचा संवाद 
- अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने ओटीटी प्लॅटफॉर्म्‌स ऍण्ड सक्‍सेसफुल मार्केटिंग ऑफ फिल्म्स या विषयावरील व्याख्यान 
- प्रसिद्ध चित्रपट निर्माते, लेखक आर बाल्की यांचे विजय तेंडूलकर मेमोरियल लेक्‍चरअंतर्गत व्याख्यान 
- न्यू इंडिया अशुरन्सच्या वतीने फिल्म इन्शुरन्स या विषयावरील संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन. 
- बिश्वदीप चॅटर्जी यांचे साउंड व बेंजामिन गेलानी यांचे अभिनय या विषयावर सत्र 

भारतीय चित्रपट या विभागातील चित्रपटांची नावेदेखील या वेळी जाहीर करण्यात आली. ती याप्रमाणे, अ नाईट, अ डे (दिग्दर्शक : प्रताप जोसेफ टी), निर्वाणा इन (दिग्दर्शक : विजय जयपाल), ऍक्‍झॉन (दिग्दर्शक : निकोलस खारकोनगोर), केडी (दिग्दर्शक : मधुमिता सुंदीरामन), विडोज ऑफ सायलेन्स (दिग्दर्शक : प्रवीण मोरच्छाले), द शॅडो ऑफ ऑथेल्लो (दिग्दर्शक : इश्‍तेयाक खान), द होम ऍण्ड द वर्ल्ड टुडे (दिग्दर्शक : अपर्णा सेन), ट्रीज अंडर द सन (दिग्दर्शक : डॉ. बिजू), द सीड (दिग्दर्शक : रजनी बसुमतरी), सिंगल स्लीपर साईज (दिग्दर्शक : राधाकृष्णन पार्थिबम).