
स्वस्तातील सोन्याच्या लालसेने तरुणाची फसवणुक; टोळक्याकडुन जबर मारहाण
नसरापूर - किकवी, ता. भोर येथे एक किलो सोने (Gold) फक्त दहा लाखात देण्याचे आमिष दाखवत सोने खरेदी करावयास आलेल्या तरुणाला (Youth) आठ ते नऊ जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) करत, त्याच्याकडील रोख रकमे बरोबर ऐवजाची साडेआठ लाखाची लुट (Loot) करत चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत डोंगर बाजुकडे पळ काढला. राजगड पोलिसांनी (Police) चोरट्यांचा तातडीने शोध घेतला परंतु चोरटे मिळु शकले नाहीत.
राम मनोजकुमार आसावा (वय 23 रा. धनकवडी, पुणे, मुळगाव कुंडलवाडी, जि. नांदेड) या तरुणाने या बाबत राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किकवी ता. भोर येथील महामार्गा पासुन अवघ्या अर्धा किलोमिटर अंतरावर मारहाणीसह लुटण्याची ही घटना घडली.
राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी या बाबत माहीती देताना सांगितले कि, फिर्यादी राम आसावा यांचा मित्र रविंद्र शेट्टी हे पुणे येथे एकामेकाजवळ राहतात एके दिवशी शेट्टी यांना त्यांच्या हाँटेल मध्ये पुर्वी काम करत असलेला आचारी प्रेम (संपुर्ण नाव माहीती नाही) याने फोन करुन माझ्या मित्राला पैशाची खुप गरज आहे. त्याच्याकडे एक किलो सोने आहे, ते कोण घेत असेल तर पहा, असे सांगितले. यावर शेट्टी यांचा मित्र राम आसावा याने सोने घ्यायची तयार दाखवली. एके दिवशी सोने पाहण्यासाठी प्रेम त्याचे चार मित्र यांची गाठभेठ झाली. सोन्याची खात्री पटल्यावर प्रेमच्या मित्राने याने 15 लाख रुपयामध्ये एक किलो सोने देतो असे सांगितले. परंतु, शेवटी दहा लाख रुपयांवर सौदा ठरला. राम आसावा व शेट्टी यांनी पैशाची तयारी झाल्याचे सांगितल्यावर प्रेम याने मित्राला फोन केला असता त्यांने ता. 6 रोजी पैसे घेऊन किकवी ता. भोर येथे महामार्गावर बोलावले.
हेही वाचा: ‘सर्वांसाठी घरं’ उपक्रम प्राधान्याने राबविणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
राम आसावा रोख आठ लाख रुपये घेऊन शेट्टी व प्रेम यांच्यासह अन्य तीन मित्र मिळुन सहा जण तीन मोटारसायकलवर किकवी परिसरात सांयकाली पाच वाजता आले. तेथे आल्यावर प्रेम याने साथीदारांना फोन केला व आम्ही आलो आहोत. कुठे यायचे विचारल्यावर त्यांनी प्रेम बरोबर फक्त दोघे जण महामार्गाजवळील कच्च्या रोडने आत मध्ये यायला सांगितल्यावर राम आसावा, शेट्टी व प्रेम असे तिघे कच्चा रस्त्यावरुन साधारण पाचशे मिटर अंतरावर पुण्यात भेटलेले चार जण त्यांना दिसले. त्यांनी पैसे कोठे आहेत, हे विचारल्यावर दुचाकीच्या डिकी मधील पैसे काढुन दाखवत असतानाच मागील बाजुने चार ते पाच अनोळखी इसम हातात काठ्या घेऊन त्यांच्याकडे पळत येत असताना दिसले. त्यांनी व तिथे उभे राहीलेल्या चार जणांनी मिळुन राम व शेट्टी यांना लाकडी दांडक्यांनी मारहाण करावयास सुरुवात केली. व त्याच वेळी प्रेम यांने राम आसावा यांच्या हातातील आठ लाख रुपयांची रोख रक्कम हिसकावुन घेतली. तर इतर जणांनी या दोघांची पाकीटे फोन खिशातुन काढुन घेऊन जवळच्या डोंगराच्या बाजुने पोबारा केला.
यानंतर राम आसवा व शेट्टी यांनी किकवी पोलिस चौकीत येऊन झालेल्या प्रकराची माहीती दिली. पोलिसांनी तातडीने त्या भागात जाऊन लुटणारयांचा शोध घेतला. परंतु. कोणीही मिळुन आले नाही. दरम्यान, या घटनेची माहीती मिळताच भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले पुढील तपास राजगड पोलिस करत आहेत.
Web Title: Deceiving Youth Lure Of Cheap Gold Violent Beatings By Gangs Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..