उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा पुणे दौरा; सीईटीबाबत दिली महत्वाची माहिती

मीनाक्षी गुरव
Thursday, 13 August 2020

सामंत यांनी गुरूवारी शिक्षक/ प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनीस भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत बोलताना सामंत म्हणाले,"कोरोनाची सदयस्थिती पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. याबाबत उद्या न्यायालयात तारीख आहे. त्यामुळे त्या विभागाचा प्रमुख म्हणून आज मी त्यावर बोलणं उचित नाही. जो विचार पूर्वी केला होता, तोच विचार आता करत आहोत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता परीक्षा घेता येणार नाहीत, आणि हेच प्रतिज्ञापत्र आम्ही न्यायालयासमोर सादर केले आहे."​

पुणे : "​सीईटी परीक्षेसाठी तालुका स्तरावर शिवाय विभागीय स्तरावर सीईटीची परीक्षा केंद्रे करू शकतो का याचा सर्व्हे सीईटी आयुक्त करत आहेत. सीईटीच्या आयुक्तांना स्वायत्त अधिकार दिले गेले आहेत. येत्या ७-८ दिवसात सीईटीसंबंधी बैठक होऊन निर्णय घेतला जाईल.'', असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी अधोरेखित केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामंत यांनी गुरूवारी शिक्षक/ प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनीस भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत बोलताना सामंत म्हणाले,"कोरोनाची सदयस्थिती पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. याबाबत उद्या न्यायालयात तारीख आहे. त्यामुळे त्या विभागाचा प्रमुख म्हणून आज मी त्यावर बोलणं उचित नाही. जो विचार पूर्वी केला होता, तोच विचार आता करत आहोत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता परीक्षा घेता येणार नाहीत, आणि हेच प्रतिज्ञापत्र आम्ही न्यायालयासमोर सादर केले आहे."

राज्यभरातील शिक्षकांना पुण्यातून मिळणार होणार प्रशिक्षण
"पुण्यात शिक्षकांसाठी टीचर ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी एक डिसेंबरला सुरू करण्याचे ठरविण्यात आलेअसं आहे. प्राध्यापक आणि शिक्षक यांनी आधुनिक ज्ञान घ्यावे, या उद्देशाने या अकॅडमीची स्थापना झाली आहे. डिसेंबरपासून हे युनिट सुरू होईल. पुण्यात महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना विद्या दान मिळणार आहे," असा सुतोवाच सामंत यांनी केला.

रात्रभर पाऊस; खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे

शरद पवार यांच्या वक्तव्यावर सामंत यांचे मौन
"महाविकास आघाडीमधील तीनही पक्षात चांगला समन्वय आहे. कोणी तरी आपल्या अस्तित्वासाठी उगाच चर्चा करत आहेत. सध्या जवळपास ६५ ते ७० टक्केकोकणवासी कोकणात पोहचले आहेत. उगाच कोणीही टीका करून नये. कोकणातील लोक शिवसेना सोबत आहेत. तिन्ही पक्षाने कोकणवासियांची चांगली काळजी घेतली आहे."असेही सामंत यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांच्यावादाबाबत सामंत यांना विचारले असता,"शरद पवार यांनी केलेल्या कुठल्याही वक्तव्यावर बोलणार नाही" असे सांगत त्यांनी मौन पाळले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision CET will be taken in eight days informed Higher Education Minister Uday Samant