esakal | बारामतीतील जनावरांच्या बाजाराबाबत घेतलाय हा निर्णय... 
sakal

बोलून बातमी शोधा

cow

ज्या बाजार समित्यांमध्ये जनावरांचे नियमित बाजार भरविले जातात, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये खंड पडला आहे, अशा बाजार समित्यांनी

बारामतीतील जनावरांच्या बाजाराबाबत घेतलाय हा निर्णय... 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जनावर बाजार गुरुवारपासून (ता. 28) सुरू करण्यास जिल्हा उपनिबंधकांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार गुरुवारपासून जळोची बाजार समितीच्या आवारातील जनावर बाजार सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली. 

भोरमधील आणखी दोघांचे कोरोना अहवाल... 
 

येणारा खरीप हंगाम लक्षात घेता शेतीची कामे व पशुधनाची खरेदी विक्री सुरू होणे अत्यंत आवश्‍यक आहे. ज्या बाजार समित्यांमध्ये जनावरांचे नियमित बाजार भरविले जातात, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये खंड पडला आहे, अशा बाजार समित्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करून व गर्दी होऊ न देता जनावरांचे बाजार त्वरित सुरू करावेत, असे याबाबतच्या जिल्हा उपनिबंधकांनी पत्राद्वारे कळविले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा उपनिबंधकांच्या या पत्राची दखल घेत बाजार समितीने जनावरांचा बाजार गुरुवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्येकाने मास्कचा वापर करणे अनिवार्य असून, शारीरिक अंतर पाळणे, सातत्याने सॅनेटायझर्सचा वापर करणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, यांचे बंधन सर्वांवर घालण्यात आले आहे. गर्दी होऊ नये, या साठीही आवश्‍यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. जनावर बाजारात येणाऱ्यांनीही या सर्व बाबींची काळजी घेण्याचे आवाहन बाजार समितीने केले आहे.