शाळा प्रवेशाचे वय कमी करण्याचा निर्णय चिंता वाढविणारा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

'अवघ्या तीन वर्षांचा देवांश आता कुठे तरी लडीवाळ बोलू लागलाय. विविध प्रकारच्या खेळात तो रमत आहे. पण त्याच्याहुन लहान म्हणजे अवघ्या अडीच वर्षाच्या मुलांना यंदा नव्हे, पण पुढच्या वर्षापासून पूर्व प्राथमिकला प्रवेश घेता येणार असल्याचा राज्य सरकारचा निर्णय चिंता वाढविणारा आहे," असे मत देवांशचे वडील किरण यांनी मांडले.

पुणे - 'अवघ्या तीन वर्षांचा देवांश आता कुठे तरी लडीवाळ बोलू लागलाय. विविध प्रकारच्या खेळात तो रमत आहे. पण त्याच्याहुन लहान म्हणजे अवघ्या अडीच वर्षाच्या मुलांना यंदा नव्हे, पण पुढच्या वर्षापासून पूर्व प्राथमिकला प्रवेश घेता येणार असल्याचा राज्य सरकारचा निर्णय चिंता वाढविणारा आहे," असे मत देवांशचे वडील किरण यांनी मांडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'अगदी लहान वयात मुलांना शाळेत जाण्याचा ताण देणे योग्य नाही,' जळगावहुन पुण्यात कामानिमित्त आलेले किरण सांगत होते. तर "लहान वयात पूर्व प्राथमिकला आणि साडेपाच वर्ष पूर्ण झाल्यास पहिलीला पाल्याला शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय अंतिम असेल, तर काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

कोरोनाकाळात द्या आहाराकडे लक्ष!; जागतिक आरोग्य संघटनेचे आवाहन

शाळेत काय शिकविले जाणार आणि कसे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पूर्वप्राथमिक शाळांमधील अभ्यासक्रम काय आणि तो कसा शिकविला पाहिजे याचा गांभिर्याने विचार व्हावा," असे पीयूष शहा (पालक) यांचे म्हणणे आहे.
पाल्याची अडीच वर्षे पूर्ण झाली की त्यास पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश घेणे, तर साडेपाच वर्षे पूर्ण झाल्यावर इयत्ता पहिलीला प्रवेश मिळेल, असा निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला. अर्थात या निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून (म्हणजेच२०२१-२२) होणार आहे.

रुग्णवाहिकांत ऑक्‍सिजन सुविधा; कोरोना रूग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी पुणे महापालिकेचा पुढाकार 

इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीची वयोमर्यादा सहा वर्षे निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राज्यातील सीबीएसई, आयसीएसई, आयबी अशा सर्व मंडळांच्या शाळांतील प्रवेशाच्या नियमांत समानता यावी, यासाठी शासनाने जानेवारी २०१५मध्ये शासन निर्णय जाहीर करून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ३१ जुलै रोजी वयाची सहा वर्षे पूर्ण करणारा विद्यार्थी पहिलीसाठी पात्र ठरेल, असे निश्चित केले. त्यानंतर ही तारीख २५ जानेवारी, २०१७च्या शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबर करण्यात आली. यानंतर प्राथमिकच्या शिक्षण संचालकांनी दिलेल्या प्रस्तावानुसार शासनाने सुधारित निर्णय घेत या तारखेत पुन्हा बदल करत आता ती ३१ डिसेंबार करण्याचे ठरविले आहे. यामुळे अडीच वर्षांच्या पाल्याला पूर्व प्राथमिकच्या वर्गात तर साडेपाच वर्षांच्या पाल्याला इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेता येऊ शकणार आहे. या नव्या निर्णयाप्रमाणे विद्यार्थ्यांचे वय ३१ डिसेंबरपूर्वी अनुक्रमे तीन आणि सहा वर्षे पूर्ण होणे बंधनकारक असणार आहे. 

मावळात कोरोना घालतोय थैमान; एकाच दिवशी सापडले सव्वा दोनशे रुग्ण
 
'लहान मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करता इयत्ता पहिलीसाठी वयाची सहा वर्ष पूर्ण असण्याची अट योग्य असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या अनेकदा सिद्ध झाले आहे. तरी राज्य सरकारने घाईने हा निर्णय घेतला आहे. याचा पुर्नविचार करणे गरजेचे आहे. पूर्व प्राथमिक शाळांमधील अभ्यासक्रम कसा आहे, या शाळांमध्ये काय शिकविले जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांच्या वयानुसार विकासाचा विचार करून पूर्व प्राथमिक वर्गात काय शिकविले पाहिजे हे निश्चित करणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने विविध खेळ, लेखनपूर्व आणि वाचनपूर्व उपक्रम घेणे आवश्यकता आहे."
- डॉ. श्रुती पानसे, बाल मानसोपचारतज्ञ

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision to lower the school entry age raises concerns