esakal | बारामतीतील वाहनचालकांसाठी घेतलाय हा निर्णय... 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

सिनेमा रस्त्यावर भिगवण चौक ते इंदापूर चौकादरम्यान चार चाकी व दुचाकी वाहने पार्क करु देण्यास वाहतूक आराखड्यात विरोध दर्शविण्यात आला आहे. त्याऐवजी

बारामतीतील वाहनचालकांसाठी घेतलाय हा निर्णय... 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील सिनेमा रस्त्यावर दुचाकी व चारचाकी पार्किंग संदर्भात व्यापा-यांच्या भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ठेवल्या जातील. या संदर्भात व्यापा-यांना दिलासा देणाराच निर्णय घेतला जाईल, जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत या रस्त्यावरील वाहनांवर तूर्त कारवाई केली जाणार नाही, असा तोडगा आज नगरपालिकेत झालेल्या बैठकीत निघाला. 

जय शिवराय : राजगडावरील दुरुस्तीचे काम सुरू, पुरातत्व विभागाने घेतली दखल 

या बैठकीस नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, नगरसेवक संजय संघवी, सुनील सस्ते, विष्णुपंत चौधर यांच्यासह पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी व इतर व्यापारी उपस्थित होते. 

पुण्यातील दोन खासदार टाॅप फाईव्ह परफाॅर्मर 


सिनेमा रस्त्यावर भिगवण चौक ते इंदापूर चौकादरम्यान चार चाकी व दुचाकी वाहने पार्क करु देण्यास वाहतूक आराखड्यात विरोध दर्शविण्यात आला आहे. त्याऐवजी पर्यायी वाहनतळांवर वाहने पार्क करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. असा निर्णय झाल्यास या रस्त्यावरील व्यापा-यांकडे ग्राहक फिरकरणारच नाहीत, अगोदरच अडचणीत आलेले व्यापारी आणखी अडचणीत येतील, अशी व्यापा-यांची भावना होती. 

या संदर्भात अजित पवार जेव्हा बारामतीत येतील, तेव्हा त्यांना याबाबत माहिती दिली जाईल व योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सचिन सातव यांनी दिली. 
या बैठकीत व्यापा-यांनी हा रस्ता मोठा आहे, त्यामुळे दुचाकी पार्किंग करु द्यावे, अशी मागणी केली होती. पौर्णिमा तावरे, सचिन सातव, संजय संघवी आदींनी यात सर्वांना विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय होईल, अशी ग्वाही दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

केवळ सिनेमा रस्त्यापुरताच हा विषय मर्यादीत नाही, तर वाहतूक आराखड्याच्या अंमलबजावणीदरम्यान ज्या अडचणी येतील व जेथे योग्य मागणी असेल, त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून त्यात दिलासादायक मार्ग निश्चित काढला जाईल.
 - सचिन सातव, 
गटनेते, बारामती नगरपालिका