dead body found
sakal
पुणे - सारसबागेजवळील नेहरू स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या एका मोटारीत शुक्रवारी (ता. ३०) तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. संबंधित तरुण चार दिवसांपासून बेपत्ता होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, तरुणाच्या मृत्यूमागचे गूढ उकलण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी तपास सुरू केला आहे.