रांजणगावला महागणपती मंदिरात मोगऱ्याच्या सव्वा लाख फुलांची सजावट

RANJANGAON
RANJANGAON

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिराचा मुख्य गाभारा व मंदिर परिसरात आज संकष्ट चतुर्थीनिमित्त मोगऱ्याची सव्वा लाख फुले व इतर फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोरोनामुळे नागरिकांनी महागणपतीचे दर्शन सोशल मीडियावर घेऊन समाधान व्यक्त केले.

 रांजणगाव येथे आज संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फ महागणपतीची पहाटे अभिषेक व पूजा करण्यात आली. दुपारी महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. येथील प्रगतशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे महापुजेसाठी मुख्य गाभारा व मंदिर परिसरात सव्वा लाख मोगरा व इतर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांची आकर्षक सजावट, पोशाख व सुवर्णालंकार यामुळे महागणपतीचे रूप आकर्षक व मनमोहक दिसत होते. तसेच, साईदीप मोल्डिंग इंडस्ट्रीज मार्फत ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन महागणपती चरणी अर्पण करण्यात आले.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्ण बंद असून "श्रीं"ची दैनंदिन पूजा व धार्मिक विधी सुरू आहेत, असे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. या वेळी विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अॅड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पुजारी मकरंद कुलकर्णी व प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com