esakal | काय सांगता, पुण्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला एक लाखाचा आकडा!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Test

मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील २७, पिंपरी चिंचवडमधील २१ आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ११ रुग्णांचा समावेश आहे. नगरपालिका आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

काय सांगता, पुण्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला एक लाखाचा आकडा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात गुरुवारी (ता.६) एकूण कोरोना रुग्णांचा एक लाखाचा आकडा क्रॉस झाला आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण १ लाख २६४ कोरोना रुग्ण नोंदले गेले आहेत. यामध्ये दिवसभरातील २ हजार ९५५ नव्या कोरोना रुग्णांचा समावेश आहे. यापैकी पुणे शहरातील १ हजार ४४० जण आहेत.

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये एक हजार १२, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २७०, नगरपालिका क्षेत्रात ११८ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ११५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

एक वर्षापासून पोलिसांना देत होता गुंगारा, गुन्हे शाखेच्या युनीटने...​

दरम्यान, गुरुवारी दिवसभरात ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही बुधवारी (ता.५) रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी (ता.६) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील २७, पिंपरी चिंचवडमधील २१ आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ११ रुग्णांचा समावेश आहे. नगरपालिका आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी पुणे शहरातील एक हजार ४८६, पिंपरी चिंचवडमधील ४५७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १९३ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी ७७ जण आहेत.

कोरोना हा उपचाराविना बरा होणारा किरकोळ आजार; झेडपी सभापतींनी सांगितला स्वत:चा अनुभव​

एकाहत्तर हजार पूर्णपणे बरे

पुणे शहरातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी ७० हजार ९०४ जण उपचारानंतर पूर्णपणे बरे (कोरोनामुक्त)  झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४३ हजार ६०६, पिंपरी चिंचवडमधील १८ हजार ६५८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५ हजार ४२८ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी एक हजार ६०६ जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image