
पुणे - पुणे महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता वाढविणे आवश्यक आहे. कामकाजाची जुनाट पद्धत बदलून अद्ययावत होणे, क्षेत्रीय कार्यालयांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक आहे. शहरातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेणे, कामे वेळेत मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून काम करणार असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.