डिजिटल बारामती 'ॲम्ब्रेला ॲप’चे अजित पवार यांच्या हस्ते लोकर्पण

शहरातील नागरीकांच्या शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, नागरी सुविधा, आपत्कालीन मदत अशा अनेक गरजा मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर पूर्ण होणार आहेत.
ajit pawar
ajit pawarsakal

बारामती : सध्याचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून बारामती शहरातील नागरीकांच्या शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, नागरी सुविधा, आपत्कालीन मदत अशा अनेक गरजा मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर पूर्ण होणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांच्या दैनंदिन गरजांची सुलभतेने पूर्तता करण्याचा प्रयत्न असून, या मध्यमातून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

मुंबई तील सह्याद्री अतिथीगृहात बारामती नगरपरिषद, आयसीआयसीआय फाऊंडेशन, रेव्हमॅक्स टेलिकॉम, उन्नती डिजीटल या संस्थांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद, आयसीआयसीआय फाऊंडेशनचे विनीत रुंगटा, कौस्तुभ बुटाला उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, बारामती नगरपरिषदेच्यावतीने ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’ची निर्मिती करुन नवे पाऊल टाकले आहे. या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून टेलीमेडिसिन अ‍ॅप, क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन ॲप, जीआयएस टॅगिंग या कामावर देखरेखीचं ट्रॅकिंग प्रणाली, फिनएक्सा हे प्रॉपर्टी मॅनेजमेंट संबंधीचं ॲप, स्थानिक व्यवसायांच्या जाहीरातींसाठी लोकऑफ ॲप, आपत्कालीन स्थितीत वैयक्तिक बचावासाठी एसओएस ॲप, जीआरएस हे तक्रार निवारण प्रणालीसंबंधीचं ॲप एकत्र उपलब्ध होणार आहेत.

मोबाईलच्या एका क्लिकवर सर्व ॲप उपलब्ध झाल्याने, बारामतीकरांना दैनंदिन गरजांसाठी घराबाहेर जाण्याची गरज नाही, या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांचे जीवन, दैनंदिन व्यवहार, अधिक सहज, सोपे, सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी, हे अम्ब्रेला ॲप डाऊनलोड करावे, घरबसल्या नागरी सुविधा मिळवण्यासाठी या ॲपचा वापर सर्वांनी करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विनीत रुंगटा यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौस्तुभ बुटाला यांनी केले.

'बारामती डिजिटल अम्ब्रेला ऍप'च्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा :

▪️टेलीमेडिसिन अ‍ॅप :

▪️क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन

▪️जीआयएस टॅगिंग: कार्य ट्रॅकिंग आणि देखरेख प्रणाली

▪️फिनएक्सा: संपत्ती व्यवस्थापन सोल्यूशन्स :

▪️लोकऑफ (स्थानिक व्यवसायाची जाहिरात)

▪️एसओएस- आमचे जीवन वाचवा (वैयक्तिक आपत्कालीन बचाव)

▪️तक्रार निवारण प्रणाली (जीआरएस)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com